Mumbai Donate Hands

by Maratha Soyrik


Productivity

free



"लोकसहभागातून गाव तिथे अभ्यासिका चळवळ" संकल्पना​"लोकसहभागातून गाव तिथे अभ्यासिका चळवळ" उपक्रमाच्या म...

Read more

"लोकसहभागातून गाव तिथे अभ्यासिका चळवळ" संकल्पना​"लोकसहभागातून गाव तिथे अभ्यासिका चळवळ" उपक्रमाच्या माध्यमातून, आपण पुढील काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक खेडोपाडी/गावोगावी पोहचणार आहोत. गावातील प्रत्येक सुजाण नागरिकांना, विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व, दर रविवारी साप्ताहिक ऑनलाईन मार्गदर्शन, सोशल मीडिया, तसेच संवेदनशील विद्यार्थी,कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पटवून देणार आहोत आणि त्यांच्याच माध्यमातून गावोगावी, आपल्या सर्वसामान्य माणसाच्या हक्काची लोकसहभागातून "वाचन संस्कृती अभ्यासिका" निर्माण करणार आहोत.​आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपण आपल्या गावामध्ये अभ्यासू, होतकरू, गरजू, शालेय विद्यार्थी/विद्यार्थिनी तसेच गावातील सर्व नागरिक‌ यांच्यासाठी "लोकसहभागातून गाव तिथे अभ्यासिका चळवळ"हा उपक्रम राबवणार आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील तरुणांना गावातच दर्जेदार पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक मानस आपल्या समूहाचा आहे. या उपक्रमामध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके, कादंबरी, विविध संत साहित्य, बालसाहित्य, अनुवादित साहित्य इत्यादी पुस्तकांचा समावेश असेल. हा उपक्रम यशस्वी करण्याची प्रामाणिक जबाबदारी, आपल्या सर्व महाराष्ट्रातील गावकऱ्यांची आहे. ​आपल्या वाचन संस्कृती अभ्यासिका साठी गावोगावी थोड्याप्रमानात मदत लागणार आहे. आपण सर्व अभ्यासिकेसाठी प्रामाणिकपणे सहकार्य कराल हा आम्हा सर्वांना विश्वास आहे.​आपण आपल्या गावातील अभ्यासिकेसाठी काय मदत करू शकता ?​१.) अभ्यासिकेसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची यादी आपणास मिळेल, त्या यादीतील किमान एक किंवा एकापेक्षा जास्त पुस्तके उपक्रमास देऊन आपण सहकार्य करू शकता.​२.) आपल्याकडील जुने पुस्तके असतील तर ती पुस्तके अभ्यासिकेला देऊन सहकार्य करू शकता.​३.) आपणास नवीन पुस्तके घेण्यासाठी जेवढी शक्य होईल, तेवढी आर्थिक मदत करू शकता.(आपल्याला आपल्या नावे मूळ पुस्तके/वस्तू घेतल्याची पावती मिळेल.)​४.) आपण आपल्या अभ्यासिकेसाठी जी खोली/हॉल करणार आहोत, त्याचे दर वर्षी 11 महिन्यासाठी करार असणार आहे, खोलीला वार्षिक भाडे असणार आहे. आपणास शक्य होत असेल तर एक महिन्याचे किंवा वर्षभराचे भाडे भरून सहकार्य करू शकता.​५.) आपणाकडे असणाऱ्या वापरलेल्या जुन्या/नव्या खुर्च्या/ टेबल/ कपाट इत्यादी अभ्यासिकेस देऊन सहकार्य करू शकता.​६.) आपण आपला वाढदिवस नेहमी केक कापून साजरा करत असतो, तो येथून पुढे अभ्यासिकेसाठी गरजेचे असणारे पुस्तके भेट देऊन साजरा करूया. यामुळे वर्षभर विद्यार्थी आपण दिलेले पुस्तके वाचून ज्ञान मिळवत राहतील व आपला वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल.​७.) अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना दररोजची वर्तमानपत्रे/महिन्याची मासिके लागतील. वर्षभराचे किंवा महिन्याचे वर्तमानपत्राचे/मासिकांचे बिल भरून, आपण सहकार्य करू शकता.​१०.) अभ्यासिकेचे कार्यालयीन काम पाहण्यासाठी गावातील होतकरू, अभ्यासू, गरजू ग्रंथपाल विद्यार्थी असतील. त्यांना आपण ठराविक मानधन देणार आहोत. त्याचे महिन्याचे/वर्षभराचे मानधन देऊन आपण सहकार्य करू शकता.​११)‌ अभ्यासिकेसाठी एक स्वतंत्र कम्प्युटर किंवा लॅपटॉप असणार आहे. आपल्याकडे जुने कॉम्पुटर/ लॅपटॉप असेल तर आपण ते अभ्यासिकेसाठी देऊन सहकार्य करू शकता.​१२.) लग्न, जयंती, पुण्यतिथी, वर्षश्राद्ध यांवर केल्या जाणाऱ्या खर्चातून थोडा खर्च, आपल्या अभ्यासिकेसाठी करून सहकार्य करू शकता.​या आपल्या सहकार्यातून आपण आपला नवीन उज्वल भारत घडवणार आहोत. हे सर्व आपल्या सर्वांच्या प्रामाणिक सहकार्याने शक्य आहे.​विशेष आवाहन :-आपल्याला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात,प्रत्येक तालुक्यात लोकसहभागातून गाव तिथे अभ्यासिकेसाठी जिल्हा व तालुका स्वयंसेवक नेमणूक करणे आहे. इच्छुकांनी नक्की संपर्क करावा.​टीप:-जिल्हा व तालुका स्वयंसेवकांना कोणत्याही प्रकारचे मानधन मिळणार नाही. समाजासाठी काहीतरी करायचे आहे, अशी प्रामाणिक तळमळ असणाऱ्यांनी नक्की संपर्क करावा. आपले भविष्य उज्ज्वल असेन.​आपलाश्री. विश्वास विष्णुपंत लोंढे "लोकसहभागातून गाव तिथे अभ्यासिका चळवळ"संपर्क:- 8888690162